आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Tuesday, 7 December 2021

पोलीस अधिकारी भेट...

शासकीय आश्रमशाळा दहेल येथे मोलगी पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी यांनी शाळेच्या परिसरातून जात असताना सहज शाळेला भेट दिली व विद्यार्थांना कोविड - १९  च्या नवीन प्रकार बद्दल माहिती दिली तसेच त्यांना त्यांचे भविष्यात चांगले करिअर घडावे यासाठी मार्गदर्शन केले व संवाद साधला.तसेच विद्यार्थांना चॉकलेटचे वाटप केले.

Sunday, 5 December 2021

अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यक्रम

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे शासकीय आश्रमशाळा दहेल येथे कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे आलेल्या पाहुण्यांनी खूप मनोरंजक रित्या व  जादूटोणा चमत्कार करतांना बुवा बाबा कशाप्रकारे आपणास फसवतात याचे प्रयोग करून त्यामागचे विज्ञान स्पष्ट केले. 

Thursday, 18 November 2021

सिकलसेल मार्गदर्शन व तपासणी...

 भगवान बिरसा मुंडा जयंती सप्ताह निमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत दहेल शाळेत सिकलसेल मार्गदर्शन व तपासणी करण्यात आली 


Sunday, 15 August 2021

वृक्षारोपण...

15 आँगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  शासकीय आश्रम शाळा दहेल च्या नियोजित नवीन जागेत वृक्षारोपण करण्यात आले....

सुदाम काटे फाँऊंडेशन, पुणे ची पुस्तके व साहित्य वाटप...

शासकीय आश्रमशाळा दहेल येथे AIF अमेरिकन इंडिया फाऊंडेशन मधील फेलो यांनी लाँकडाऊन तसेच सद्यस्थितीत दहेल गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला व सुदाम काटे फाँऊंडेशन, पुणे ची पुस्तके व साहित्य वाटप करण्यात आले...

Sunday, 8 August 2021

AIF शैक्षणिक मार्गदर्शन...

अमेरिकन इंडिया फाऊंडेशन (AIF ) तर्फे दहेल गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन देण्यात येत आहे. यासाठी रामसिंग वसावे व कालुसिंग वळवी हे AIF फेलो काम करित आहेत.

Tuesday, 30 March 2021

दहेल येथील होळी उत्सव

दहेल येथील होळी उत्सवातील काही क्षणचित्रे...

Saturday, 6 March 2021

तापमान व पल्स तपासणी...

शासन जी आर नुसार शासकीय आश्रम शाळा दहेल येथे कोविड प्रतिबंध साहित्य खरेदी करण्यात आले व तापमान व पल्स तपासणी कोविड व्यवस्थापक श्री. केशव सर , श्री. रमन सर, श्री. किरण सर  यांनी केली व तापमान व पल्स तपासणी नोंदवहीतनों दी घेण्यात आल्या.


*

Saturday, 27 February 2021

प्रार्थना...

शासकीय आश्रमशाळा दहेल येथील  विद्यार्थ्यांना प्रार्थना शिकवतांना श्री. रमन सर व श्री. किरण सर 



Thursday, 25 February 2021

कोविड 19 मार्गदर्शन व तपासणी...

 कोविड १९ चा पार्दुर्भाव रोखण्यासाठी शालेय स्तरावर डॉ. महेश पाडवी व सहकारी यांचेकडून विद्यार्थांना मार्गदर्शन व त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.





Wednesday, 24 February 2021

Kitchen Garden (परसबाग)

Kitchen Garden (परसबाग) : 



घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय. परसबाग करताना आपला हेतू असतो तो आपल्या रोजच्या खाण्यामध्ये आवश्यक असलेला भाजीपाला पिकवणे. या वेळी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रकारची भाजी कशी घेता येईल, याचा विचार करून जागेचे नियोजन करावे लागते हे नियोजन करताना सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार भाजीपाला पिकांची निवड करावी लागते.
                                                               शासकीय आश्रमशाळा दहेल येथील परिसरात अशीच  परसबाग तयार करण्यात आली आहे त्यात वांगे,कांदा,लसुण,मुळा, गाजर, कोबी ,पालक,आंबा , टमाटे,पपई , मका या पालेभाज्या व फळभाजी ची लागवड करण्यात आली आहे. यासाठी श्री. किरण पोहल्या वसावे हे शिक्षक व त्यांचे कुटुंबीय  मेहनत घेत आहेत.


Tuesday, 23 February 2021

संत गाडगे महाराज जयंती...

शासकीय आश्रमशाळा दहेल येथे दि. २३ फेब्रुवारी रोजी परिसरातील साफसफाई करण्यात आली व  संत गाडगे  महाराजांची जयंती सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...तसेच विद्यार्थ्यांना संत गाडगे  महाराजांच्या जीवनावर आधारित  माहितीपट दाखविण्यात आला.

संत गाडगे महाराज जयंती...माहिती


गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

                 संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

         गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

                    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.

 👬 गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट

                         14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.

गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...