Kitchen Garden (परसबाग) :
घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय. परसबाग करताना आपला हेतू असतो तो आपल्या रोजच्या खाण्यामध्ये आवश्यक असलेला भाजीपाला पिकवणे. या वेळी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रकारची भाजी कशी घेता येईल, याचा विचार करून जागेचे नियोजन करावे लागते हे नियोजन करताना सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार भाजीपाला पिकांची निवड करावी लागते.
शासकीय आश्रमशाळा दहेल येथील परिसरात अशीच परसबाग तयार करण्यात आली आहे त्यात वांगे,कांदा,लसुण,मुळा, गाजर, कोबी ,पालक,आंबा , टमाटे,पपई , मका या पालेभाज्या व फळभाजी ची लागवड करण्यात आली आहे. यासाठी श्री. किरण पोहल्या वसावे हे शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मेहनत घेत आहेत.
No comments:
Post a Comment