Saturday, 1 August 2020
Unlock Learning 2020
Wednesday, 1 July 2020
आश्रमशाळेत राबवावयाचे विविध उपक्रम...
v नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विदयते।।.. भगवदगीता
खरोखरच या जगात ज्ञानासारखे
पवित्र दुसरे असे काहीही नाही.ज्ञानाला विवेकाची व संस्काराची जोड
असेल तरच समाजाची निर्मिती होते. त्यासाठी बालवयातच योग्य ज्ञान व संस्कार
यांची गरज आहे.
v करी मनोरंजन जो मुलांचे । जडेल नाते
प्रभुशी तयाचे …. सानेगुरुजी
v
विदयार्थ्याची
उपस्थिती वाढविण्यासाठी :
विदयार्थ्यांची
शालेय उपस्थिती वाढविण्यासाठी विदयार्थ्याचे समुपदेशन करणे, गैरहजर राहणाऱ्या
विदयार्थ्यांना पालकांचे प्रबोधन करणे, त्यांचेशी पत्र व्यवहार
करणे किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे अध्यापकांच्या मदतीने गैरहजर राहणाऱ्या
विदयार्थ्यांना शाळेत उपस्थित करणे, त्यांना शालेय गळती
पासून रोखणे.
v
विदयार्थ्याचे
वाचन कौशल्य विकसित करणे :
भाषा विषयात
विदयार्थ्यांना चांगले गुण मिळावेत म्हणून विदयार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण
करुन वाचन कौशल्य विकसित करणे.
v
विविध
स्पर्धांचे आयोजन :
विदयार्थ्यामधील
शैक्षणिक दर्जा उंचावणे व त्यांचे ज्ञानात भर घालणे यासाठी निबंध लेखन, कथाकथन, वत्कृत्व, क्रीडा स्पर्धा, चित्रकला
स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा , ओरिगामी , विज्ञान प्रयोग इत्यादीचे
आयोजन करणे.
v
शालेय परिपाठ, वार्ताफलक यांचे
माध्यामातुन विदयार्थ्याच्या ज्ञानात भर घालणे.
v विविध दिवस साजरे करणे : मराठी भाषा दिन , वाचन दिन , क्रिडा दिन , विज्ञान दिवस , पर्यावरण दिन , जलदिन असे अनेक दिवस साजरे करता येतात.
v तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार :
या
सारख्या विषयांवर विदयार्थ्याना मार्गदर्शन करुन त्यांच्यात
सकारात्मक दृष्टीकोन तसेच स्वयंप्रेरणा इत्यादी गुण रुजविले.
v
स्वच्छता व आरोग्य यांचे महत्व विदयार्थ्याना समजावणे तसेच
शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना प्रेरित करणे.
व्यक्तीगत स्वच्छता ठेवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे.
v
रात्र अभ्यासिका:
विदयार्थ्यामध्ये
वाचनाची व अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी वर्षभर रात्र अभ्यासिकेचे वेळापत्रक तयार
करुन त्याचे अध्यापकांमार्फत अंमलबजावणी करणे.
इयत्ता 10 वी चा
निकाल उंचावण्यासाठी पर्यवेक्षित अभ्यास हा उपक्रम अत्यंत प्रभावी आहे.
v
“निश्चयाचे बळ,
तुका म्हणे हेचि फळ” हा
सकारात्मक दृष्टीकोन विचार विदयार्थ्यामध्ये रुजविणे.
v
हस्तलिखिते, नियतकालिक,
ग्रंथचर्चा, प्रकट
वाचन, परिसर सर्वेक्षण.
v
व्यक्तिमत्व विकास माहिती,
प्रावीण्य प्राप्त मुलांचे कौतुक,
एकाने दुसऱ्यास
शिकविण्याचा उपक्रम
v
क्रीडास्पर्धा, पत्रमैत्री,
वर्गवाचन पेटी, वर्ग
सुशोभन
v
व्यवसाय मार्गदर्शन,
शैक्षणिक उत्सव,
निसर्ग मंडळ, खगोलशास्त्र
मंडळ
v
एकच ध्यास गुणवत्ता विकास
v
वाचन-एक जीवन प्रवास
v
ज्ञानी मी होणार
v
नमस्कार एक संस्कार
v
एक तास सरावाचा
v
विज्ञान प्रदर्शन
v
लेक शिकवा अभियान
v
किशोरवयीन मुलींसाठी ज्युडो कराटे प्रशिक्षण
v
लेझीम- एक वेगळा उपक्रम
v
ग्रंथ नाते- वाचाल
तर वाचाल किंवा वाचाल तर घडाल
v
चालू घडामोडींचे विदयार्थ्याना मार्गदर्शन
v
माझी दिनचर्या- आरोग्याचा
चांगल्या सवयी
v
पाण्याचा योग्य वापर
v
स्वच्छतेच्या नियमांचे पालन
v
मी कोण होणार? विदयार्थ्यासमोरील
आदर्श
v
मुलगा,मुलगी एक समान
v
हात धुण्याचे , कान
साफ करण्याचे महत्व
v
हस्ताक्षर सुधार प्रकल्प
v
कुटुंब संस्कार/
संघर्ष संस्कार/
शब्द संस्कार/ प्रेम
संस्कार/ जन्म संस्कार/ ऐक्य
संस्कार/ लेखन
संस्कार इत्यादीचे
विदयार्थ्याना महत्व सांगणे.
v
बाल
स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान सहभाग
v
स्काऊट-गाईड,
कराटे , कब
– बुलबुल उपक्रम
v
वाचाल
तर वाचाल- वाचनाचा लळा
फुलवी जीवनाचा मळा.
v
उस्फुर्त लेखनासाठी चालना देणे.
v
कृती गीत , नाट्यातून शिक्षण
v
संगणकाचे किवा त्याद्वारे ऑनलाईन शिक्षण
v
खेळाद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास
माहिती
संकलन – श्री. दिपक रा. पाटील
अधिक्षक शा. आ. शा. दहेल
९६६५४४५८५२ , ८७८८५६६८२२
आमच्या शाळेचे फेसबुक पेज – शासकीय आश्रमशाळा दहेल
Monday, 15 June 2020
शासकीय प्राथमिक आश्रमशाळा, दहेल ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार ( इयत्ता १ ली प्रवेश )
शासकीय प्राथमिक आश्रमशाळा, दहेल ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार ( इयत्ता १ ली प्रवेश )
आमच्या शाळेची वैशिष्ट्ये :
१. निसर्गरम्य वातावरण
२. अनुभवी ,तज्ञ, कला ,क्रिडा ,व तंत्रस्नेही शिक्षक
३. NET / SET व उच्चशिक्षित अधिक्षक व अधीक्षिका
४. डिजीटल शिक्षण
५. वाचनालय
६.उपक्रमशील शाळा
७. खेळासाठी पोषक वातावरण
८. करडीपथ संस्थेचा इंग्लिश लर्निंग प्रोग्राम
९. BVG ची आरोग्य वाहिनी
१०. शाळेची वेबसाईट व फेसबुक पेज
https://dahelschool.blogspot.com/
https://www.facebook.com/dahelashramschool
आपल्या पाल्याच्या उत्तम भविष्यासाठी खालील लिंक भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा...
https://forms.gle/rNxsCeFrvywitbGU6
तसेच संपर्क करा -
श्री. डी. आर पाटील (अधिक्षक ) मो. न. ९६६५४४५८५२
श्री. किरण वसावे (प्रा. शिक्षक रोज.) मो. न. ९४२१७९७४१०
श्री . केशव वसावे (प्रा. शिक्षक रोज.) मो. न. ९४२३०९१४५८
श्री. मगन तडवी (प्रा. शिक्षक) मो. न. ९४०३४४१५२२
Wednesday, 13 May 2020
Friday, 6 March 2020
प्रथोमोपचार पेटी...
एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे 'प्रथमोपचार'.व त्यासाठी लागणाऱ्या औषध व साहित्याची पेटी म्हणजे प्रथोमोपचार पेटी.अशीच प्रथोमोपचार पेटी आम्ही शाळेत बनवली आहे. प्रथमोपचार पेटीत काय काय असावे यासाठी काही औषधांची यादी केली आहे. व काही औषधं PHC ओहवा येथून आणले आहेत.
१. Combiflam - ताप, अंगदुखी
२. Crocin - ताप, डोकेदुखी
३. Disprin - डोकेदुखी
४. Alerid - D - सर्दीसाठी
५. Coldact - सर्दीसाठी
६. Cetrizane - सर्दीसाठी
७. Strepsil - घशात जळजळ
८. Pudin Hara - अॅसिडीटी
९. Eno - अॅसिडीटी
१०. Gelusil - अॅसिडीटी
११. Zinetac - अॅसिडीटी
१२. Cyclopam - पोटदुखी
१३. Bl - Qulnol - जुलाबासाठी
१४. Iodex - गुढगेदुखीसाठी
१५. Soframycin - मलम - जखमेवर
१६. Avomine - प्रवासात होणारी वांती
१७. डोकेदुखीवरचा बाम
त्याचप्रमाणे इमर्जन्सी फोन नं, चिकटपट्टी, बँडेज, कात्री, न वापरलेले ब्लेड, सेफ्टी पिन्स, साबण, वरील औषधे कसे वापरावयाचे त्याची माहीती आदी गोष्टीही या पेटीत ठेवण्यात आल्या आहेत.
Sunday, 1 March 2020
खुला आसमान चित्रकला स्पर्धा...
खुला आसमान - बाल कलाकार, बाल चित्रकार, बाल वैज्ञानिक, बाल शास्त्रज्ञ, युवा कलाकार, युवा वैज्ञानिक, युवा शास्त्रज्ञ यांची सर्जनशीलता व प्रतिभा व्यक्त होण्यासाठी व त्याला चालना देण्यासाठी आर्ट इंडिया फाऊंडेशन या सार्वजनिक धर्मादाय संस्थेतर्फे खुला आसमान व्यवस्थापित केले जाते. Indiaart.com हे आर्ट इंडिया फाऊंडेशन चे ऑनलाइन भागीदार आहे. खुला आसमान हे मुले, मुली, युवक व युवती यांच्या साठी सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठीचे व्यासपीठ आहे. खुला आसमान विनामूल्य आहे. बाल कलाकार, बाल चित्रकार, बाल वैज्ञानिक, बाल शास्त्रज्ञ, युवा कलाकार, युवा वैज्ञानिक, युवा शास्त्रज्ञ यांच्या प्रतिभेला चालना आणि आव्हान देणे हे खुला आसमान चे उद्दिष्ट आहे.
शासकीय आश्रमशाळा दहेल येथे विद्यार्थ्यांना व्हिडीओ दाखवून खुला आसमान चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील काही चित्र...
Thursday, 27 February 2020
मराठी भाषा दिवस
मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा सार्थ अभिमान वाटतो. हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.
Wednesday, 19 February 2020
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती...
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेस साजरी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की, त्यांच्या महानिर्णाणाला 332 वर्षे झाली तरीही त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे. आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी किती प्रतिकूल स्थितीत हे सतीचे वाण आपल्या हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो. शिवाजी महाराज त्या प्रदेशात रहात होते तो प्रदेश आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता आणि त्या मध्ययुगीन राजवटींमध्ये सुलतानांच्या विरोधात बंडावा करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची. डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करून जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफोच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत. अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्या सुलतानांच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकता समाजता होती, पण शिवाजी महाराजांनी अशाही स्थितीत परकियांची राजवट उलथून टाकून स्वत:चे राज्य निर्माण करण्याचा पण केला. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असते.
शासकीय आश्रमशाळा दहेल येथे दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पोवाडा गाऊन, जयघोषाने व त्यांच्या जीवन चरित्राचा आढावा देऊन, कथा सांगून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...
Friday, 31 January 2020
बिरसा मुंडा वाचनालय...
शाळेतील वाचनालय म्हणजे संस्कार मंदिरच. आश्रमशाळा दहेल येथे शाळेतच छोटेखानी बिरसा मुंडा मुक्त वाचणालय बनवले आहे. विद्यार्थी आवडीनुसार पुस्तक दोरीवरून काढतात व वाचतात.
सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...
चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...






















