आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Thursday, 27 February 2020

मराठी भाषा दिवस

मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा  सार्थ अभिमान वाटतो. हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.






शासकीय आश्रमशाळा दहेल येथे कवितेचे , कथेचे सादरीकरण करून तसेच  घोषणा फेरी करून मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. 

No comments:

Post a Comment

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...