आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Wednesday, 19 February 2020

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती...

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेस साजरी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की, त्यांच्या महानिर्णाणाला 332 वर्षे झाली तरीही त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे. आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी किती प्रतिकूल स्थितीत हे सतीचे वाण आपल्या हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो. शिवाजी महाराज त्या प्रदेशात रहात होते तो प्रदेश आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता आणि त्या मध्ययुगीन राजवटींमध्ये सुलतानांच्या विरोधात बंडावा करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची. डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करून जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफोच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत. अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्या सुलतानांच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकता समाजता होती, पण शिवाजी महाराजांनी अशाही स्थितीत परकियांची राजवट उलथून टाकून स्वत:चे राज्य निर्माण करण्याचा पण केला. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असते.

                                                     शासकीय आश्रमशाळा दहेल येथे दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पोवाडा गाऊन, जयघोषाने व त्यांच्या जीवन चरित्राचा आढावा देऊन, कथा सांगून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...







No comments:

Post a Comment

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...