आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Tuesday, 2 December 2025

जागतिक दिव्यांग दिन (World Day of Persons with Disabilities)

*3 डिसेंबर*
*World Disabilities Day*
 *जागतिक दिव्यांग दिन!* 
♿♿♿♿♿♿♿♿

जागतिक दिव्यांग दिन (World Day of Persons with Disabilities) दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये, ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक 'दिव्यांग दिन' म्हणून साजरा केला जातो.

जागतिक दिव्यांग दिनाच्या (World Day of Persons with Disabilities ) निमित्ताने *दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति, सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे.* जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी, दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या उध्दारासाठी मदत मिळावी. म्हणून या दिवसाची योजना आहे.
RPWD ACT 2016 दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार अपंग या शब्दा ऐवजी आता दिव्यांग असा शब्द बदल करण्यात आला आहे. तेव्हापासुन ३ डिसेंबर 'जागतिक दिव्यांग दिन' म्हणून देखील ओळखले जाते.

जागतिक एड्स दिवस...

जागतिक एड्स दिन २०२५ (World AIDS Day 2025) निमित्त विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन माहिती खालीलप्रमाणे आहे. दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.
🛑 जागतिक एड्स दिवस २०२५: विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
जागतिक एड्स दिवस २०२५ ची थीम:
"व्यत्ययांवर मात करा, एड्स प्रतिसादात परिवर्तन आणा"
(Overcoming disruption, transforming the AIDS response)
या थीमचा अर्थ असा आहे की, सध्या जागतिक आरोग्य सेवेत आलेल्या अडथळ्यांना दूर करून, एचआयव्ही/एड्स (HIV/AIDS) ला प्रतिसाद देण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणे आणि परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे.
१. एड्स आणि एचआयव्ही (AIDS and HIV) बद्दल मूलभूत माहिती
लक्षात ठेवा: एचआयव्ही म्हणजे एड्स नाही. योग्य उपचार (ART) घेतल्यास एचआयव्ही बाधित व्यक्ती सामान्य आणि निरोगी जीवन जगू शकते.
२. एचआयव्हीचा प्रसार कसा होतो?
एचआयव्ही फक्त खालील ४ प्रमुख मार्गांनी पसरतो:
असुरक्षित लैंगिक संबंध (Unprotected Sexual Contact).
रक्ताद्वारे (उदा. संक्रमित रक्त घेणे किंवा अवयव प्रत्यारोपण).
संक्रमित सुया किंवा सिरिंजचा वापर (उदा. औषधे टोचण्यासाठी सुयांची देवाणघेवाण).
आईकडून मुलास (गरोदरपणात, प्रसूतीदरम्यान किंवा स्तनपानाद्वारे).
३. एचआयव्हीचा प्रसार कसा होत नाही?
या गैरसमजुती दूर करणे खूप महत्त्वाचे आहे:
❌ स्पर्श केल्याने नाही. (हाताने, मिठी मारल्याने)
❌ एकाच भांड्यात जेवल्याने नाही.
❌ खोकल्याने किंवा शिंकल्याने नाही.
❌ डास किंवा इतर कीटकांच्या चावण्याने नाही.
❌ सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्याने नाही.
❌ एकाच वर्गात बसल्याने नाही.
४. प्रतिबंधाचे मार्ग (Prevention)
विद्यार्थ्यांनी आणि समाजाने जागरूक राहण्यासाठी हे मार्ग महत्त्वाचे आहेत:
शिक्षण आणि जागरूकता: एचआयव्ही/एड्स बद्दलची खरी आणि वैज्ञानिक माहिती स्वतः जाणून घ्या आणि इतरांना सांगा. गैरसमज दूर करा.
सुरक्षित व्यवहार: असुरक्षित लैंगिक संबंध टाळा.
सुयांचा सुरक्षित वापर: कोणत्याही कारणास्तव सुयांची देवाणघेवाण करू नका. नेहमी नवीन आणि निर्जंतुक सुया वापरा.
चाचणी: आपला एचआयव्ही स्टेटस जाणून घेण्यासाठी योग्य वेळी आणि गरजेनुसार चाचणी करा. लवकर निदान म्हणजे लवकर उपचार!
५. कलंक आणि भेदभावाचा अंत (Ending Stigma and Discrimination)
एचआयव्ही/एड्सच्या लढ्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे समाजात असलेला कलंक (Stigma) आणि भेदभाव (Discrimination).
करुणा आणि आदर: एचआयव्ही बाधित व्यक्तींना सहानुभूती आणि आदर द्या. त्यांच्यापासून दूर राहू नका.
भेदभाव थांबवा: त्यांना शिक्षण, रोजगार किंवा सामाजिक उपक्रमांपासून वंचित ठेवू नका.
समानता: एचआयव्ही बाधित व्यक्तींनाही समाजात समान अधिकार आहेत हे लक्षात ठेवा.
तुमची भूमिका: आजचे तरुण म्हणून, तुम्ही समाजात जागरूकता निर्माण करू शकता आणि प्रेम, सहानुभूती आणि स्वीकारार्हता (Acceptance) वाढवून भेदभाव संपवण्यास मदत करू शकता.
एक संकल्प करूया:
"जागरूकता वाढवा, गैरसमज दूर करा आणि एड्स मुक्त जगासाठी एकत्र काम करा."



Friday, 28 November 2025

महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन...

दि. 28.11.2025 रोजी शासकीय आश्रमशाळा दहेल येथे महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले यांचा खालील मुलमंत्राचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला.
"विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले."

शाळा भेट...

दि.28.11.2025 रोजी शासकीय आश्रमशाळा दहेल येथे श्री अरविंद वळवी साहेब यांनी आकस्मिक भेट दिली व शाळा, वसतिगृह, वर्गावर प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला व सर्व कर्मचाऱ्यांची सभा घेऊन मार्गदर्शन केले. एकत्रित रित्या शालेय परिसर, स्वच्छतागृह ,स्वयंपाकगृह ,कोठीगृह यांची तपासणी करून समाधान व्यक्त केले.

Wednesday, 26 November 2025

Friday, 8 August 2025

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

 चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

शासकीय आश्रमशाळा दहेल येथे  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थिनी यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली .



Thursday, 23 January 2025

सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ...

शासकिय आश्रमशाळा दहेल या.अक्कलकुवा जि.नंदुरबार...
आयोजित 
🥁🪘🎷🎺🎸🪗🪕
सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ...
🎭🪇🎨🥁🪘🎷🪗
(आदिवासी विद्यार्थी विविध गुणदर्शन/गुणगौरव सोहळा)
👯‍♂️🤺🤾‍♂️🥇🥈🥉🎭

सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस समारंभ-
सकाळी- 10.00 ते 12.30

पालक मेळावा-
सकाळी -9.00-10.00

दिनांक -26.01.2025

स्थळ -शा.आ.शा.दहेल
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

जागतिक दिव्यांग दिन (World Day of Persons with Disabilities)

*3 डिसेंबर* *World Disabilities Day*  *जागतिक दिव्यांग दिन!*  ♿♿♿♿♿♿♿♿ जागतिक दिव्यांग दिन (World Day of Persons with Disabiliti...