करडीपथ संस्थेचा मुलांसाठी इंग्रजी लर्निग प्रोग्राम...रोज १ तास...
Friday, 20 December 2019
इंग्रजी शिक्षण...कराडीपथ
आदिवासी आश्रमशाळांमध्ये इंग्रजी विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी करडीपथ या संस्थेमार्फत डिजीटल इंग्रजी शिक्षण उपक्रम राबवीले जात आहे.आमच्या शाळेतील विद्यार्थी डिजीटल इंग्रजी शिक्षण घेतांना..
Monday, 16 December 2019
जलसंवर्धन तसेच जलजागृती सप्ताह...
भविष्यामध्ये मानवाला पाण्यासाठी संघर्ष करायची वेळ येता कामा नये, याकरीता पाण्याची बचत करणे व जलसंवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी जागरुकतेने प्रयत्न करावे. म्हणून शासकीय आश्रमशाळा येथे जलसंवर्धन तसेच जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.
शाळेतील काही मोठे विद्यार्थी व शिक्षक मिळून आम्ही शाळेजवळील छोट्या नदीवर गुरांना पाणी पिण्यासाठी एक बंधारा बांधला.
Wednesday, 11 December 2019
सिकलसेल तपासणी...
सिकलसेल हा रक्तातील लाल रक्तपेशींचा रोग आहे. प्रामुख्याने बालकांमध्ये व क्वचितप्रसंगी वयस्कांमध्येही हा रोग आढळतो. मध्य भारतात, काही विशेष जाती-जमातीत हा रोग प्रामुख्याने आढळतो. हा रोग आनुवंशिक परंपरेचा आहे. पुरातन काळात मलेरिया या रोगापासून बचाव करण्यासाठी मानवाच्या जनुकांमध्ये काही बदल झाले. आपल्या पेशींमध्ये गुणसूत्रांची (जनुक ज्यात स्थित असतात असे क्रोमोझोम्स) जोडी असते. एक आईकडून गुणसूत्र येते तर दुसरे पित्याकडून. एका गुणसूत्रातील जनुकात बदल झाल्यास मलेरियापासून बचाव होतो, परंतु असा बदल झालेला दुसराही गुणसूत्र असल्यास मात्र रोगच उत्पन्न होतो. एक गुणसूत्र बदलले की त्याला 'ट्रेट' किंवा 'कॅरिअर' म्हणतात.
मध्य भारतातील काही विशिष्ट जातींमध्ये व जमातींमध्ये या 'ट्रेट'चे प्रमाण ३०-४० टक्क्यांपर्यंत आहे. 'ट्रेट' असणाऱ्या पुरुष व महिलांमधील संयोगातून दोन 'ट्रेट' एकत्र येतात व संततीत रोग उत्पन्न होतो. अर्थात, असे प्रत्येक वेळेस न घडता प्रत्येक गर्भधारणेत अशी शक्यता २५ टक्के असते. जगातील इतरही देशांमध्ये हा रोग आढळतो. आफ्रिका खंड, युरोपमधील भूमध्य सागराच्या अवतीभोवतीचे देश आणि अमेरिकेतील स्थलांतरित अफ्रिकन लोक व मूळचे रेड इंडियन्स व हिस्पॅनिक्समध्ये हा रोग दिसून येतो. भारतातील सिकलसेलचा रोग जगाच्या इतर भागातील रोगापेक्षा कमी तीव्रतेचा असतो.
विकृत रक्तपेशी
लाल रक्तपेशी या आपण श्वासाद्वारे घेतलेल्या प्राणवायूद्वारे शरीराच्या प्रत्येक पेशीपेशीपर्यंत पोहोचतात. आपण श्वास न घेता फार काळ राहू शकत नाही. त्याचप्रमाणे लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील प्रत्येक अवयव हा लवकरच थकतो, कारण त्याला आवश्यकतेएवढा प्राणवायूचा पुरवठा होऊ शकत नाही. लाल रक्तपेशी सामान्य व्यक्तीमध्ये तीन ते सहा महिने जगते. त्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचे लाल संयुग असते. ते प्राणवायूला धरून ठेवते. लाल रक्तपेशी ही थाळीसारखी असते व एखादे मऊ रबर जसे वाकडेतिकडे होऊ शकते, पिळवटल्या जाऊ शकते तसे ही रक्तपेशी आपल्या बारीकसारीक रक्त वाहिन्यांतून आपला आकार वाकडातिकडा करून निसटते व पेशीपेशीपर्यंत पोहोचते. (जसा एखादा लहान चपळ मुलगा बारीक फटीतून अंग काढत निघतो.) सिकल रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनमध्ये दोष उत्पन्न होतो. त्यामुळे ते रबराप्रमाणे मऊ न राहता कडक होते. त्यामुळे लाल रक्तपेशींचा आकार बदलतो. ती कोयत्याप्रमाणे होते (सिकल म्हणजे कोयता). हा कडक कोयता रक्तवाहिन्यांमधील बारीक छिद्रातून बाहेर पडू शकत नाही. ती वाहिनी ब्लॉक करून टाकतो. त्यामुळे तो अवयव हळूहळू निकामी होतो. तेथे खूप जास्त प्रमाणात वेदना निर्माण होतात. ज्या अवयवात रक्तवाहिन्यांचे जाळे जास्त तिथे जास्त त्रास होतो. उदा. यकृत (लिव्हर), प्लिहा किंवा पानथरी (स्प्लीन), फुप्फुसे, हाडे इत्यादी. ही विकृत रक्तपेशी लवकरच नष्ट होते. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ लागते.
दि. १० डिसेंबर रोजी शाळेत सिकलसेल तपासणी व मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी व शालेय कर्मचारी...
Tuesday, 3 December 2019
अटल आरोग्य वाहिनी-आदिवासी जीवनदायिनी वजन व उंची तपासणी...
महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागामध्ये असणा-या
आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना एकात्मिक आरोग्य सेवा पुरविण्याच्या
उद्देशाने “अटल आरोग्य वाहिनी-आदिवासी जीवनदायिनी” या योजने अंतर्गत आरोग्य तपासणी तसेच
आश्रम शाळांतील विद्यार्थी आजारी पडले कि १०८ न वर
फोन करून बोलावण्यात येते. ही सुसज्ज
रुग्णवाहिका २४ तास तैनात आहे.
त्याचबरोबर ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ सह सज्ज असणा-या या रुग्णवाहिकांमध्ये ‘आयुष’ २४ तास उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर आरोग्य तपासणी संबंधीच्या अनेक गोष्टींचा ह्या योजनेत समावेश आहे. शासकीय आश्रमशाळा दहेल येथे वजन, उंची व इतर तपासणी साठी दर महिन्यातून एकदा अटल आरोग्य वाहिनी बोलावण्यात येते.
Subscribe to:
Comments (Atom)
सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...
चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...














