आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Monday, 16 October 2023

नामांकित डॉक्टर सदिच्छा भेट...

शासकीय आश्रमशाळा दहेल येथे सुरत सिव्हिल हॉस्पिटल येथील नामांकित डॉक्टर यांच्या टीम ने येऊन विद्यार्थ्यांना तेल, साबण, शाम्पू, Vaseline या वस्तू भेट दिल्यात तसेच मिठाई,बर्फी खाऊ म्हणून दिला व आरोग्य व स्वच्छ्ता विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Monday, 2 October 2023

2 ऑक्टबर चित्रपट...

2 ऑक्टोंबर गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पुनर्जीवन करण्यात व एकूणच आजच्या पीढीत गांधीजींबाबत आत्मीयता व त्यांच्या विचारांवर विचार करण्यास आज लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटाने हातभार लावला.शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल येथे आज हा चित्रपट दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही झाले.

Sunday, 1 October 2023

बालकांचे हक्क व सरंक्षण..

शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल तालुका - अक्कलकुवा, जिल्हा - नंदुरबार येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती. सायली चिखलीकर मॅडम व शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मुंगळे सर यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क व सरंक्षण याबद्दल PPT बनवून माहीती देण्यात आली.
खालील 🔗 लिंकवर क्लिक करून Presentation बघावे 


एक तारीख एक तास श्रमदान...

२ ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमीत्त ०१ ऑक्टोंबर २०२३ रोजी शासकीय प्राथमिक आश्रम शाळा दहेल परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली, या मोहिमेत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा तसेच सर्व वर्ग-4 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवित संपूर्ण शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. सदर कार्यक्रम चे फोटो https://swachhatahiseva.com/ या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले.

Friday, 1 September 2023

पोस्टर प्रदर्शन व ॲक्टीविटी रूम तयार करणे...

विद्यार्थ्यांना दिलेल्या विविध विषयांवर पोस्टर बनविण्यात आले तसेच ते ॲक्टिविटी रूम मध्ये त्याचे पर्दशन भरविण्यात आले.

Friday, 18 August 2023

आरोग्य पथक मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी...सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. साबळे साहेब भेट

शासकीय आश्रम शाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे आज रोजी PHC Ohava येथील आरोग्य पथक मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे HB व BMI तपासले. तपासणी दरम्यान आपल्या कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. साबळे साहेब हे उपस्थित होते*.त्यांनी सर्व डॉक्टर्स व शालेय कर्मचा-याना मार्गदर्शन केले.व वर्गात जाऊन 
विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व शालेय दस्तावेज तपासणी केली. शालेय परिसर , कोठीगृह ,वस्तीगृह खोल्यांची तपासणी केली.

Wednesday, 9 August 2023

जागतिक आदिवासी दिवस...

जागतिक आदिवासी दिवस...

शासकीय आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. गावातील युवक यांनी उत्कृष्ठ असे भाषण देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच  विविध पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करून दिवस साजरा करण्यात आला.

Sunday, 16 July 2023

Sunday is Funday...

शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल तालुका - अक्कलकुवा, जिल्हा - नंदुरबार येथे, सन 2023 / 24 या शैक्षणिक सत्रात वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम सुरू करीत आहोत.
      "रविवारचा विरंगुळा" या उपक्रमातून प्रेरणा घेऊन आमच्या शाळेत संडे इज 'फन ' डे हा उपक्रम शैक्षणिक सत्र सुरू झाल्या पासून सुरू केलेला आहे. 
या उपक्रमांतर्गत दर रविवारी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेण्यात येतात. विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व शैक्षणिक चित्रपट दाखवून मनोरंजनाबरोबरच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास उपयुक्त होतील अशा काही कृती या उपक्रमांतर्गत घेण्यात येतात. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रात्यक्षिके, खेळ, स्पर्धा, यांचे आयोजन करण्यात येते.🙏

Friday, 14 April 2023

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा कॅलेंडर 2023

आपल्या शाळेच्या छायाचित्रांची निवड प्रकल्प कार्यालय तळोदा कॅलेंडर 2023 साठी निवड केली आहे

खालील 🔗 लिंक वर क्लिक करा

Tuesday, 7 February 2023

AIF तर्फे शिक्षकांना प्रशिक्षण




AIF ( अमेरिकन इंडिया फाऊंडेशन ) तर्फे शिक्षकांना शैक्षणिक Kit कसे वापरावे याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Thursday, 26 January 2023

वार्षिक आदिवासी विद्यार्थी विविध गुणदर्शन सोहळा...

 वार्षिक आदिवासी विद्यार्थी विविध गुणदर्शन सोहळा

 ( सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण ) 

🎖️🏆🥇🥈🥉

आज दि. 26.01.2023 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून  ध्वजारोहण तसेच वार्षिक आदिवासी विद्यार्थी विविध गुणदर्शन सोहळा  ( सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण ) कार्यक्रम घेण्यात आला.





Monday, 23 January 2023

विविध स्पर्धा...

आज विविध खालील स्पर्धा घेण्यात आल्या.

1. खो -खो ,
2. एक मिनिट स्पर्धा, 
3. म्यूजिक बॉल पासिंग गेम, 
4. बकेट बॉल, (बादलीत बॉल टाकणे)
5. सॅक रेस (गोणी पायाखाली घेऊन धावणे) 

विजयी विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

Tuesday, 17 January 2023

गाव दिवाळी पाडा प्रतिकृती...

शासकीय आश्रम शाळा दहेल येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी पाड्यावरील गाव दिवाळी देखावा तयार केला.

भूगोल दिवस...

शासकीय आश्रम शाळा दहेल येथे भूगोल दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात परिसरातील सर्व झाडे फुले यांची माहिती इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना इयत्ता निहाय वर्ग शिक्षकांनी दिली तसेच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व भारताचा नकाशा कागदावर काढला व प्रत्येक जिल्ह्याला नावे दिलीत.भूगोल दिनाचे औचित्य साधून परिसरातील शेती, नद्या डोंगर झाडे इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून वेगवेगळे उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आले.
भूगोल दिनासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यामुळे भूगोल दिन उत्साहात साजरा झाला.

Thursday, 12 January 2023

स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती...

शासकीय प्राथमिक आश्रम शाळा दहेल येथे स्वामी विवेकानंद जयंती, ‘राष्ट्रीय युवा दिन’ (National Youth Day) आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरा करण्यात आली. उपस्थित सर्व शिक्षकवृंद , अधिक्षक, अधिक्षिका , मुख्याध्यापक... कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे...

Tuesday, 3 January 2023

सावित्रीबाई फुले जयंती...

शासकिय आश्रमशाळा दहेल येथे आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.श्रीम. छाया रतन जाधव (अधीक्षिका ) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...