शासकीय आश्रमशाळा दहेल येथे सुरत सिव्हिल हॉस्पिटल येथील नामांकित डॉक्टर यांच्या टीम ने येऊन विद्यार्थ्यांना तेल, साबण, शाम्पू, Vaseline या वस्तू भेट दिल्यात तसेच मिठाई,बर्फी खाऊ म्हणून दिला व आरोग्य व स्वच्छ्ता विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Monday, 16 October 2023
Monday, 2 October 2023
2 ऑक्टबर चित्रपट...
2 ऑक्टोंबर गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पुनर्जीवन करण्यात व एकूणच आजच्या पीढीत गांधीजींबाबत आत्मीयता व त्यांच्या विचारांवर विचार करण्यास आज लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटाने हातभार लावला.शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल येथे आज हा चित्रपट दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही झाले.
Sunday, 1 October 2023
बालकांचे हक्क व सरंक्षण..
शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल तालुका - अक्कलकुवा, जिल्हा - नंदुरबार येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती. सायली चिखलीकर मॅडम व शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मुंगळे सर यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क व सरंक्षण याबद्दल PPT बनवून माहीती देण्यात आली.

खालील 🔗 लिंकवर क्लिक करून Presentation बघावे
एक तारीख एक तास श्रमदान...
२ ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमीत्त ०१ ऑक्टोंबर २०२३ रोजी शासकीय प्राथमिक आश्रम शाळा दहेल परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली, या मोहिमेत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा तसेच सर्व वर्ग-4 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवित संपूर्ण शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. सदर कार्यक्रम चे फोटो https://swachhatahiseva.com/ या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले.
Subscribe to:
Comments (Atom)
सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...
चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...