आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Friday, 18 August 2023

आरोग्य पथक मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी...सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. साबळे साहेब भेट

शासकीय आश्रम शाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे आज रोजी PHC Ohava येथील आरोग्य पथक मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे HB व BMI तपासले. तपासणी दरम्यान आपल्या कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. साबळे साहेब हे उपस्थित होते*.त्यांनी सर्व डॉक्टर्स व शालेय कर्मचा-याना मार्गदर्शन केले.व वर्गात जाऊन 
विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व शालेय दस्तावेज तपासणी केली. शालेय परिसर , कोठीगृह ,वस्तीगृह खोल्यांची तपासणी केली.

Wednesday, 9 August 2023

जागतिक आदिवासी दिवस...

जागतिक आदिवासी दिवस...

शासकीय आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. गावातील युवक यांनी उत्कृष्ठ असे भाषण देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच  विविध पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करून दिवस साजरा करण्यात आला.

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...