आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Sunday, 16 July 2023

Sunday is Funday...

शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल तालुका - अक्कलकुवा, जिल्हा - नंदुरबार येथे, सन 2023 / 24 या शैक्षणिक सत्रात वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम सुरू करीत आहोत.
      "रविवारचा विरंगुळा" या उपक्रमातून प्रेरणा घेऊन आमच्या शाळेत संडे इज 'फन ' डे हा उपक्रम शैक्षणिक सत्र सुरू झाल्या पासून सुरू केलेला आहे. 
या उपक्रमांतर्गत दर रविवारी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेण्यात येतात. विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व शैक्षणिक चित्रपट दाखवून मनोरंजनाबरोबरच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास उपयुक्त होतील अशा काही कृती या उपक्रमांतर्गत घेण्यात येतात. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रात्यक्षिके, खेळ, स्पर्धा, यांचे आयोजन करण्यात येते.🙏

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...