Sunday, 20 November 2022
बालहक्क दिवस...
Tuesday, 15 November 2022
आद्य क्रांतिकारक , जननायक बिरसा मुंडा जयंती...
शासकीय आश्रमशाळा
येथे १५ नोवेंबर २०२२ रोजी आद्य क्रांतिकारक , जननायक
बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
बिरसा मुंडा हे
आदिवासी नेते आणि लोकनायक होते. सध्याच्या भारतात रांची आणि सिंद्यभुमचे आदिवासी
बिरसा मुंडा यांना 'बिरसा भगवान' म्हणून लोक स्मरण करतात
बिरसा मुंडा यांनी
मुंडा आदिवासीना बिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध उभे करून हा सन्मान मिळवून दिला. १९
व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात बिरसा हे एक प्रमुख दुवा
ठरले. बिसरा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी रांची जिल्ह्यातील उलिहाडू
गावात झाला. मुंडा रीतिरिवाजानुसार त्यांचे नाव बिरसा असे ठेवण्यात आले. बिरसाच्या
वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी हातू होते. त्यांच्या जन्मानंतर
त्यांचे कुटुंब रोजगा राच्या शोधात उलिहाडू ते करूंबडा येथे स्थायिक झाले जेथे ते
शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करीत असत. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुन्हा
कामाच्या शोधात मुंबईला गेले. बिरसा लहान- पणापासून मित्रांसोबत वाळूत खेळायचा आणि
मोठे झाल्यावर त्याला मेंढ्या चरायला जंगलात जावं लागायचं. जंगलात मेंढ्या चरताना
वेळ घालवण्यासाठी ते बासरी वाजवायचा काही दिवस बासरी वाजवण्यात तो पारंगत झाले.
त्यांनी भोपळ्या पासून "तुइला" हे तंतुवादय बनवले. जे ते वाजवत असत.
त्यांच्या आयुष्यातील काही रोमांचक क्षण आखाडा गावात त्यांनी घालवले.
या गरिबीच्या काळात
बिरसा यांना शिक्षणासाठी त्यांच्या मामाच्या गावी आयुमत येथे पाठवण्यात आले. बिरमा
दोन वर्षे आयुभातूमध्ये राहून तेथे शिकायला गेले. बिरसा अभ्यासात खुप हुशार होते, त्यामुळे शाळा चालवणाऱ्या जयपाल नाग यांनी त्यानां जर्मन मिशन स्कुलमध्ये
प्रवेश घेण्यास सांगितले, ख्रिश्चन शाळेत प्रवेश घेण्यासाठी
त्यांनी धर्म बदलला आणि त्यांचे नाव बदलून बिरमा डेव्हिड उनसे ठेवले.जे नंतर बिरसा
दाऊत असे झाले. बिस रांच्या आयुष्यात नवे, वळण आले ते स्वामी
आनंद पांडे यांच्या संपर्कात आले आणि हिंदू धर्म आणि महाभारतातील पात्रांशी
त्यांची ओळख झाली.
वाचन व लेखन येत
असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन
केले.त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळया धोरणाचा त्यांना फार तिरस्कार
यायचा.सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाचा इंग्रज अधिकारी, ठेकेदार, जमीनदार, सावकार
यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला व
बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह
करण्याची घोषणा केली व म्हंटले " आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द
विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही.आम्ही
इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास
आम्ही यमसदनी पाठवू.. या आंदो- लनाला 'उलगुलान' असे म्हटले गेले. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा
मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला, बिरसा मुंडास पकडून देणा-यास
500 रूपये बक्षीस जाहीर केले. बिरसा मुंडा यांनी विविध
जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले.
इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक
केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात
आली.
9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.
धैर्याने आणि शौर्याने तू.
देशाच्या अस्मितेचे दिले भान
धरतीचा देव तू,
देशासाठी दिले बलिदान...
सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...
चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...


