आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Tuesday, 9 August 2022

जागतिक आदिवासी गौरव दिन...

जागतिक आदिवासी गौरव दिन दहेल गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत १  हजारांहून अधिक आदिवासी बांधव आणि शासकीय आश्रमशाळा दहेल येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले.
        यावेळी आदिवासी तरुणींनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. पारंपरिक शस्त्र कुर्‍हाडधनुष्यबाणकोयतातलवारबंदूक असे अनेक प्रकारचे शस्त्र हाती घेऊन आदिवासी मिरवणूक नृत्य सादर करीत होते. पारंपरिक वाद्यत्यावर ठेका धरणारे पारंपरिक वेशभूषेतील तरुण मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आदिवासी वाद्यांच्या निनादाने शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते.



सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...