v नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विदयते।।.. भगवदगीता
खरोखरच या जगात ज्ञानासारखे
पवित्र दुसरे असे काहीही नाही.ज्ञानाला विवेकाची व संस्काराची जोड
असेल तरच समाजाची निर्मिती होते. त्यासाठी बालवयातच योग्य ज्ञान व संस्कार
यांची गरज आहे.
v करी मनोरंजन जो मुलांचे । जडेल नाते
प्रभुशी तयाचे …. सानेगुरुजी
v
विदयार्थ्याची
उपस्थिती वाढविण्यासाठी :
विदयार्थ्यांची
शालेय उपस्थिती वाढविण्यासाठी विदयार्थ्याचे समुपदेशन करणे, गैरहजर राहणाऱ्या
विदयार्थ्यांना पालकांचे प्रबोधन करणे, त्यांचेशी पत्र व्यवहार
करणे किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे अध्यापकांच्या मदतीने गैरहजर राहणाऱ्या
विदयार्थ्यांना शाळेत उपस्थित करणे, त्यांना शालेय गळती
पासून रोखणे.
v
विदयार्थ्याचे
वाचन कौशल्य विकसित करणे :
भाषा विषयात
विदयार्थ्यांना चांगले गुण मिळावेत म्हणून विदयार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण
करुन वाचन कौशल्य विकसित करणे.
v
विविध
स्पर्धांचे आयोजन :
विदयार्थ्यामधील
शैक्षणिक दर्जा उंचावणे व त्यांचे ज्ञानात भर घालणे यासाठी निबंध लेखन, कथाकथन, वत्कृत्व, क्रीडा स्पर्धा, चित्रकला
स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा , ओरिगामी , विज्ञान प्रयोग इत्यादीचे
आयोजन करणे.
v
शालेय परिपाठ, वार्ताफलक यांचे
माध्यामातुन विदयार्थ्याच्या ज्ञानात भर घालणे.
v विविध दिवस साजरे करणे : मराठी भाषा दिन , वाचन दिन , क्रिडा दिन , विज्ञान दिवस , पर्यावरण दिन , जलदिन असे अनेक दिवस साजरे करता येतात.
v तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार :
या
सारख्या विषयांवर विदयार्थ्याना मार्गदर्शन करुन त्यांच्यात
सकारात्मक दृष्टीकोन तसेच स्वयंप्रेरणा इत्यादी गुण रुजविले.
v
स्वच्छता व आरोग्य यांचे महत्व विदयार्थ्याना समजावणे तसेच
शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना प्रेरित करणे.
व्यक्तीगत स्वच्छता ठेवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे.
v
रात्र अभ्यासिका:
विदयार्थ्यामध्ये
वाचनाची व अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी वर्षभर रात्र अभ्यासिकेचे वेळापत्रक तयार
करुन त्याचे अध्यापकांमार्फत अंमलबजावणी करणे.
इयत्ता 10 वी चा
निकाल उंचावण्यासाठी पर्यवेक्षित अभ्यास हा उपक्रम अत्यंत प्रभावी आहे.
v
“निश्चयाचे बळ,
तुका म्हणे हेचि फळ” हा
सकारात्मक दृष्टीकोन विचार विदयार्थ्यामध्ये रुजविणे.
v
हस्तलिखिते, नियतकालिक,
ग्रंथचर्चा, प्रकट
वाचन, परिसर सर्वेक्षण.
v
व्यक्तिमत्व विकास माहिती,
प्रावीण्य प्राप्त मुलांचे कौतुक,
एकाने दुसऱ्यास
शिकविण्याचा उपक्रम
v
क्रीडास्पर्धा, पत्रमैत्री,
वर्गवाचन पेटी, वर्ग
सुशोभन
v
व्यवसाय मार्गदर्शन,
शैक्षणिक उत्सव,
निसर्ग मंडळ, खगोलशास्त्र
मंडळ
v
एकच ध्यास गुणवत्ता विकास
v
वाचन-एक जीवन प्रवास
v
ज्ञानी मी होणार
v
नमस्कार एक संस्कार
v
एक तास सरावाचा
v
विज्ञान प्रदर्शन
v
लेक शिकवा अभियान
v
किशोरवयीन मुलींसाठी ज्युडो कराटे प्रशिक्षण
v
लेझीम- एक वेगळा उपक्रम
v
ग्रंथ नाते- वाचाल
तर वाचाल किंवा वाचाल तर घडाल
v
चालू घडामोडींचे विदयार्थ्याना मार्गदर्शन
v
माझी दिनचर्या- आरोग्याचा
चांगल्या सवयी
v
पाण्याचा योग्य वापर
v
स्वच्छतेच्या नियमांचे पालन
v
मी कोण होणार? विदयार्थ्यासमोरील
आदर्श
v
मुलगा,मुलगी एक समान
v
हात धुण्याचे , कान
साफ करण्याचे महत्व
v
हस्ताक्षर सुधार प्रकल्प
v
कुटुंब संस्कार/
संघर्ष संस्कार/
शब्द संस्कार/ प्रेम
संस्कार/ जन्म संस्कार/ ऐक्य
संस्कार/ लेखन
संस्कार इत्यादीचे
विदयार्थ्याना महत्व सांगणे.
v
बाल
स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान सहभाग
v
स्काऊट-गाईड,
कराटे , कब
– बुलबुल उपक्रम
v
वाचाल
तर वाचाल- वाचनाचा लळा
फुलवी जीवनाचा मळा.
v
उस्फुर्त लेखनासाठी चालना देणे.
v
कृती गीत , नाट्यातून शिक्षण
v
संगणकाचे किवा त्याद्वारे ऑनलाईन शिक्षण
v
खेळाद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास
माहिती
संकलन – श्री. दिपक रा. पाटील
अधिक्षक शा. आ. शा. दहेल
९६६५४४५८५२ , ८७८८५६६८२२
आमच्या शाळेचे फेसबुक पेज – शासकीय आश्रमशाळा दहेल