आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Friday, 6 March 2020

प्रथोमोपचार पेटी...

एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे 'प्रथमोपचार'.व त्यासाठी लागणाऱ्या औषध व साहित्याची पेटी म्हणजे प्रथोमोपचार पेटी.अशीच प्रथोमोपचार पेटी आम्ही शाळेत बनवली आहे. प्रथमोपचार पेटीत काय काय असावे यासाठी काही औषधांची यादी केली आहे. व काही औषधं PHC ओहवा येथून आणले आहेत.

१. Combiflam - ताप, अंगदुखी

२. Crocin - ताप, डोकेदुखी

३. Disprin - डोकेदुखी

४. Alerid - D - सर्दीसाठी

५. Coldact - सर्दीसाठी

६. Cetrizane - सर्दीसाठी

७. Strepsil - घशात जळजळ

८. Pudin Hara - अ‍ॅसिडीटी

९. Eno - अ‍ॅसिडीटी

१०. Gelusil - अ‍ॅसिडीटी

११. Zinetac - अ‍ॅसिडीटी

१२. Cyclopam - पोटदुखी

१३. Bl - Qulnol - जुलाबासाठी

१४. Iodex - गुढगेदुखीसाठी

१५. Soframycin - मलम - जखमेवर

१६. Avomine - प्रवासात होणारी वांती

१७. डोकेदुखीवरचा बाम

त्याचप्रमाणे इमर्जन्सी फोन नं, चिकटपट्टी, बँडेज, कात्री, न वापरलेले ब्लेड, सेफ्टी पिन्स, साबण, वरील औषधे कसे वापरावयाचे त्याची माहीती आदी गोष्टीही या पेटीत ठेवण्यात आल्या आहेत.


Sunday, 1 March 2020

खुला आसमान चित्रकला स्पर्धा...

खुला आसमान - बाल कलाकार, बाल चित्रकार, बाल वैज्ञानिक, बाल शास्त्रज्ञ, युवा कलाकार, युवा वैज्ञानिक, युवा शास्त्रज्ञ यांची सर्जनशीलता व प्रतिभा व्यक्त होण्यासाठी व त्याला चालना देण्यासाठी आर्ट इंडिया फाऊंडेशन या सार्वजनिक धर्मादाय संस्‍थेतर्फे खुला आसमान व्‍यवस्‍थापित केले जाते. Indiaart.com हे आर्ट इंडिया फाऊंडेशन चे ऑनलाइन भागीदार आहे. खुला आसमान हे मुले, मुली, युवक व युवती यांच्या साठी सर्जनशीलता व्‍यक्‍त करण्यासाठीचे व्‍यासपीठ आहे. खुला आसमान विनामूल्‍य आहे. बाल कलाकार, बाल चित्रकार, बाल वैज्ञानिक, बाल शास्त्रज्ञ, युवा कलाकार, युवा वैज्ञानिक, युवा शास्त्रज्ञ यांच्या प्रतिभेला चालना आणि आव्हान देणे हे खुला आसमान चे उद्दिष्ट आहे.

                   शासकीय आश्रमशाळा दहेल येथे विद्यार्थ्यांना  व्हिडीओ दाखवून खुला आसमान चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील काही चित्र...








Add caption





सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...